नवी दिल्ली : पतीशी खोटे बोलून चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेलेली राजस्थानमधील अंजू २९ नोव्हेंबरला पुन्हा भारतात परतली. विवाहित असूनही तिने तिथला प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केला आणि आपले नाव बदलून फातिमा ठेवले. ती वाघा बॉर्डरवर परतल्यावर सुरक्षा यंत्रणांनी तिची सखोल चौकशी केली. यानंतर ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. अंजूचे शेवटचे लोकेशन ३० नोव्हेंबर रोजी दिल्ली होते. मात्र ७ दिवसांनी अंजू भिंवडी, अलवर येथे असल्याचे उघड झाले.
बुधवारी पोलिसांनी अंजूची चौकशी केली. तिचे जबाब नोंदवण्यात आले. अंजूचा पती अरविंद याने भिंवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय अरविंदने अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. ३० नोव्हेंबरपासून अंजू कुठे होती हे कोणालाच माहीत नाही. मात्र आता तो भिंवडीमध्ये असून त्याने पोलिसांकडे जबाबही नोंदवला आहे.
अंजूने पंजाबमधील गुप्तचर यंत्रणांना सांगितले होते की, ती केवळ अरंिवदपासून घटस्फोट घेण्यासाठी भारतात आली आहे. याशिवाय ती मुलांनाही मिस करत होती. मात्र, अंजूचा पती अरंिवद, वडील गयाप्रसाद थॉमसकिंवा मुलं तिच्याशी बोलू इच्छित नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता त्यांचा अंजूशी काहीही संबंध नाही.