30 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्र‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखणार

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखणार

कायद्यात कठोर तरतुदी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती पुण्यात २०२४ मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचे ५ हजार ८८८ गुन्हे

मुंबई : प्रतिनिधी
कोविड काळात ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्हे नोंदणीत पुण्यात घट झाली होती. मात्र आता त्यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. ड्रग्ज सेवन करूनही गाडी चालविण्याचे प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्हच्या रिपिट प्रकरणांसाठी सुधारित कायदा करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिले. पुण्यात फुटपाथवर झोपणा-यांना शेल्टरमध्ये हलविण्यासाठी पोलिस तसेच महापालिका यांचे संयुक्त ड्राईव्ह हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चेतन तुपे यांनी पुण्यातील केसनंद फाटयावरील फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने जागेवरच चिरडल्याचे प्रकरण लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केले होते. दारूसोबत आता ड्रग्जसेवन करूनही वाहने चालविण्याचे प्रकार वाढले असल्याचेही चेतन तुपे म्हणाले असे अपघात रोखण्यासाठी टास्कफोर्स नेमण्यात यावे तसेच सिग्नल यंत्रणेत एआयचा वापर करण्यात यावा अशी मागणी चेतन तुपे यांनी केली.

अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिका-याची नेमणूक केली आहे. ट्राफिक नियोजनासाठी अ‍ॅडिशनल कमिशनर दर्जाच्या अधिका-याची मागणी आम्ही केली आहे. कोविड काळात पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे कमी झाले होते.

२०२३ मध्ये पुणे शहरात ५३८ गुन्हे नोंदविण्यात आले तर २०२४ मध्ये मात्र ५ हजार ८८८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हचे रिपिट आरोपींसाठी सुधारित कठोर कायदा करण्याचे प्रस्तावित असल्याचे योगेश कदम म्हणाले.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात अपघातात मरण पावलेल्यांसाठी १० लाख रूपये भरपाई देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर या लक्षवेधीच्या उत्तरात ५ लाख देण्यात येतात असे म्हटले आहे असा विरोधाभास का असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाखांची भरपाई एसटी अपघातात देण्यात येते तर रस्ते अपघातात ५ लाखाचीच भरपाई देण्यात येते असे स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR