मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, गेल्या ५६ महिन्यांत म्हणजेच राज्यात दररोज सरासरी आठ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत हे अंशत: खरे आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जाते. तसेच विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर शेतक-यांसाठी काय केले, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची सरबत्ती करत असतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, गेल्या ५६ महिन्यांत म्हणजेच राज्यात दररोज सरासरी आठ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत हे अंशत: खरे आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण इतर प्रदेशांपेक्षा जास्त असल्याची देखील माहिती दिली आहे.
शेतक-यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे घटक आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मराठवाडा विभागात ९५२, अकोल्यात १६८, वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५ आणि अमरावती विभागात १,०६९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या, अशी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी संसदेत माहिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील बोलत होते.
छ. संभाजीनगरात ९५२ शेतक-यांच्या आत्महत्या
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान, छत्रपती संभाजीनगर भागात ९५२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ७०७ जण मदत मिळण्यास पात्र होते आणि ४३३ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. बीड जिल्ह्यात १६७ प्रकरणांमध्ये मदत मंजूर करण्यात आली आणि १०८ प्रकरणांमध्ये आर्थिक मदत देण्यात आली.
मंठा तालुक्यात ५ महिन्यांत १३ आत्महत्या
अमरावती विभागात ४४१ प्रकरणांमध्ये शेतकरी मदतीसाठी पात्र होते आणि ३३२ प्रकरणांमध्ये मदत मिळाली. एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान १३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या.