26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत अंडे ड्रग्सपेक्षा महाग

अमेरिकेत अंडे ड्रग्सपेक्षा महाग

टेरिफ वॉर लोकांना महागाईत बुडविणार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पदभार सांभाळताच टेरिफवरून जगात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याच्याच साथीने त्यांनी सरकारी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली. आता ट्रम्प यांच्या कर्माची फळे अमेरिकन लोकांना भोगावी लागणार आहेत. टेरिफ युद्धामुळे इतर देशांनीही अमेरिकेवर जादा टेरिफ लादण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने आपल्या शेजारी देशांनाही सोडलेले नाहीय, ज्या देशांवर अमेरिकेची अन्न साखळी अवलंबून आहे. यामुळे अमेरिकेत महागाईने दोन महिन्यांतच कहर करण्यास सुरुवात केली असून लोक आता खाद्यपदार्थ्यांच्या स्मगलिंगकडे वळू लागले आहेत.

अमेरिकेच्या उत्पादनांवर शेजारी देशांसह जगभरातील इतरही देश जास्त कर आकारत असल्याने ट्रम्प यांनी देखील या देशांवर जादा कर लादला आहे. याचा परिणाम असा झाला की १०० रुपयांना मिळणारी वस्तू अचानक २००-२२० रुपयांना मिळू लागली आहे. इतर वस्तूंचे सोडले तरी किराणा साहित्य खूप महाग झाले आहे. अमेरिकेची अन्न धान्याची गरज ही शेजारी देशांवर अवलंबून होती. त्यांच्यावर कर लावल्याने आता या वस्तू खासकरून अंडी महागली आहेत. अंड्याच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की अमेरिकी लोक आता ही अंडी शेजारील मेक्सिको आणि कॅनडामधून तस्करी करू लागले आहेत.

ट्रम्प यांनी छेडलेले टेरिफ वॉर आता अमेरिकन लोकांचा खिसा खाली करू लागले आहे. इतर देशांनीही टेरिफ वाढविल्याने अमेरिकेची उत्पादने आणखी महाग झालेली आहेत. यामुळे इतर देशांत अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री थंडावणार आहे. हा फटका असतानाच अमेरिकेत मोठी मंदीची लाट उसळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कंपन्यांचे उत्पन्न रोडावणार तसेच नागरिकांना महागाईमुळे खिसा रिकामा करावा लागणार असा दुहेरी झटका आता अमेरिकेला एकट्या ट्रम्प आणि मस्क यांच्या हेकेखोरपणामुळे भोगावा लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR