26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रऔरंगजेबाच्या कबरीवरून रणकंदन वाढले

औरंगजेबाच्या कबरीवरून रणकंदन वाढले

मंत्री शिरसाट आणि विरोधी पक्षनेते दानवेंमध्ये जुंपली

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कबर असल्यामुळे आठवण होते की मुघल शासकाला हरवून येथेच पुरले होते.

ते म्हणाले की, कबर हटवण्याची मागणी हा इतिहास संपवण्याचा कट आहे. त्यांनी कबर हटवण्याची मागणी करणा-यांवर टीका केली आणि म्हणाले की, हिंमत असेल तर तिथे जाऊन तसे करून दाखवा. राज्य सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देणा-या आणि त्यांची हत्या करणा-या क्रूर शासकाच्या कबरीला महाराष्ट्रात जागा नाही.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, कबर हटवली पाहिजे. औरंगजेब आणि त्याच्या कबरीवर प्रेम करणारे त्याचे अवशेष घरी घेऊन जाऊ शकतात.

विरोधक पाकिस्तानच्या झेंड्यासह रॅली काढतात
मंत्र्यांनी दानवेंवर निशाणा साधताना म्हटले की, विरोधक पाकिस्तानच्या झेंड्यासह रॅली काढतात. ते अशा पद्धतीने विचार करत असतील, तर त्यांनी तिथे जाऊन नमाज अदा करावी. दरम्यान, मिलिंद एकबोटे यांना १६ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कबर हटवण्यासाठी खुलताबादला या
उपविभागीय दंडाधिका-यांनी शनिवारी जारी केलेल्या आदेशात माहिती दिली आहे की, एकबोटे यांची संघटना धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान दरवर्षी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करते आणि गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती की ते आणि त्यांचे समर्थक औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी खुलताबादमध्ये येऊ शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR