24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविद्यार्थिनीची आत्महत्या

विद्यार्थिनीची आत्महत्या

मुंबई : अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने बारावीतील एका विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृतिका चव्हाण (वय १७) असे या विद्यार्थिनीचे नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना विटावा येथील ग्रीन वर्ल्ड सोसायटीत घडली. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

घटनेतील मृत कृतिका ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. कृतिकाला मेडिकल क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असल्याने ती बारावीच्या अभ्यासाबरोबरच नीट प्रवेश परीक्षेचादेखील अभ्यास करत होती. गुरुवारी (ता. २६) दुपारी कृतिका आपल्या बेडरूममध्ये होती; तर तिची आई व घरकाम करणारी बाई या घरातील हॉलमध्ये होत्या. या वेळी कृतिकाने बेडरूमच्या गॅलरीमधून खाली उडी मारली.

या वेळी मोठा आवाज झाल्याने कृतिकाच्या आईने बेडरूममध्ये जाऊन बघितले असता ती खाली पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कृतिका ही अभ्यासाच्या तणावात असल्याचे समोर आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR