जिंतूर : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग तसेच मानव संसाधन विकास भारत सरकार यांच्यातर्फे पुणे येथे नुकताच राज्यस्तरीय कला उत्सव संपन्न झाला. यात जवाहर विद्यालयाचा समर्थ प्रदिपराव कनकदंडे या विद्यार्थ्याने टाकाऊ पदार्थांपासून उत्कृष्ट खेळणी तयार करण्याच्या स्पर्धेत राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याचा व मार्गदर्शकांचा सत्कार डॉ.नेहा बेलसरे उपसंचालक सामाजिक शास्त्र, पुणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
जवाहर विद्यालयाचे जिल्हास्तरीय कला उत्सवात एकूण ९ विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यात निधी सुनीलजी भोंबे (पारंपरिक लोकनृत्य), प्रतिक प्रकाशराव खंदारे (पारंपरिक लोकनृत्य), प्रितेश रमेशराव जोगदंड (पारंपरिक लोकनृत्य), वैष्णवी ब्रिजेश पटेल (शास्त्रीय गायन), श्रावणी संतोषराव खनपटे (द्विमितीय चित्रकला), सूरज भगवानराव जवळे (त्रिमितीय चित्रकला), प्रद्युम्न बालाजी गुंडावार (शिल्पकला) व समर्थ प्रदिपराव कनकदंडे (खेळणी तयार करणे) हे सहभागी झाले होते. यातील वैष्णवी ब्रिजेश पटेल, प्रितेश रमेशराव जोगदंड, प्रद्युम्न बालाजी गुंडावार व समर्थ प्रदिपराव कनकदंडे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली होती. त्यातील समर्थ कनकदंडे याने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.डी.वटाणे, विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे, संचालक किशनराव वटाणे, जेष्ठ शिक्षक संतोषराव इंगळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना कला विभागप्रमुख प्रदीप कनकनदंडे, हस्तकला विभागप्रमुख आसाराम देवकते, शंतनु कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते.