32.8 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeपरभणीपूर्णा नगरपालिकेवर भाजपाने काढला मोर्चा

पूर्णा नगरपालिकेवर भाजपाने काढला मोर्चा

पूर्णा : नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात मंगळवार, दि.१८ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिका-यांना निवेदन देण्यात आले.

शहरात मागील वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोल्हापुरी बंधा-यात पाणीसाठा उपलब्ध असून शहरात नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा त्वरित करण्यात यावा. शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा. घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामाप्रमाणे त्वरित हप्ते टाकण्यात यावेत. धर्म शाळेवरचे अतिक्रम हटवण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनावर साधना बिछडे, सविता गुंडाळे, रत्नमाला एकलारे, सिमरन कुरेशी, शोभा खाकरे, करुणाबाई शहाणे, महादेवी एकलारे, सुमित्रा वळसे, भाग्यश्री भायेकर, उमादेवी लाईतबार, प्रणिता मिटकरी, प्रशांत कापसे, बाळासाहेब कदम, मधुकर मुळे, बालाजी कदम, डॉ. अजय ठाकूर, शेख आमीन शेख अब्दुल्ला, हनुमान अग्रवाल, सुनील डुबेवार, गोविंद राज ठाकर, वैभव भायेकर, मनोहर शहाणे आदीच्या स्वाक्षरी आहेत. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR