32.8 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरात संचारबंदी कायम; अनेक शाळांना सुटी जाहीर

नागपुरात संचारबंदी कायम; अनेक शाळांना सुटी जाहीर

नागपूर : प्रतिनिधी
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून प्रचंड राडा झाल्याचे पहायला मिळाले. या सर्व परिस्थितीवर पोलिस यंत्रणांनी कडक कारवाई करत वातावरण शांत केले. या झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरात मंगळवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसून आले. असे जरी असले तरी प्रशासनाकडून नागपुरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. इतकेच नाहीतर अनेक शाळांना सुटीही जाहीर केली गेली.

नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत अनेक पोलिस आणि नागरिक गंभीर जखमी झाले. नागपूर झोन ५ चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कु-हाडीने वार करण्यात आला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत त्यांनी आता सविस्तर माहिती दिली आहे. नागपूरमध्ये अफवा पसरवणा-या आणि हिंसाचार करणा-या जिहादींवर कडक कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धनाजी, संताजी, छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी आता केली जात आहे.

दरम्यान, दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील जनजीवनावर झाला.

अनेक भागात संचारबंदी लागू
शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुटी जाहीर करण्यात आली. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉईंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळांना
सुटीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आलेल्या नाहीत.

पोलिसांकडून दुकाने बंद करण्याचे आदेश
सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR