लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा आज दि. २१ मार्च रोजी वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यासह लातूर जिल्हा भरात सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर शहरानजीकच्या मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स कारखान्याच्या वतीने आज माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे व हभप आकाश देशमुख महाराज यांच्या कीर्तन होणार आहे. या कीर्तन कार्यक्रमानंतर महाप्रसाद ही वाटप करण्यात येणार आहे तर लातूर शहरातील पोद्दार हॉस्पिटल अक्सीडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या पुढाकारातून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा नगरीचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिरात मुक्तेश्वराचा रुद्राभिषेक सोहळा सकाळी ८ वाजता होईल त्यानंतर सायंकाळी ६ वाजता औसा येथील आझाद चौकातील विविध कार्यकारी सोसायटी नूतन कार्यालय येथे दावत-ए- इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर शहर जिल्हा काँगे्रसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या पुढाकारातून कोल्हेनगरमधील गणेश मंदीरात सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संस्था पदाधिका-यांच्या वतीने करण्यात आले आहे.