मुंबई : नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकच कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या एकाही सदस्याने आपल्याला वेगळा गट समजण्यात यावे, असे पत्र दिलेले नसल्याने एकच कार्यालय देण्यात आले असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसे पत्र पात्र झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नार्वेकर यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी एकच पक्ष कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांचे नेते एकाच कार्यालयात बसणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रकरणावरून चांगलाच वाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.