27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीशी विवाहबाहय संबंध; पतीकडून मित्राची हत्या

पत्नीशी विवाहबाहय संबंध; पतीकडून मित्राची हत्या

भंडारा : पत्नीशी विवाहबा संबंध असल्याचा संशय मनात घर करून बसल्याने एका तरुणाने थेट आपल्या घनिष्ट मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी गावात घडली. संशयातून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, पतीने मित्राला चाकूने सपासप भोसकून जागीच ठार केले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंकुश साठवणे (३८) असे मृतकाचे नाव असून तो देव्हाडी ग्रामपंचायतीचा सदस्य होता. तर, मुन्ना बिरणवार (३२) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, काही दिवसांपासून आरोपीला आपल्या पत्नीचे अंकुशसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबा संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. यातूनचं दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृताकाच्या घरी एकत्र आलेत. मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूनं मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली. काकावर चाकुने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी मृतकाची पुतणी आकांक्षी धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलिस करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR