माळशिरस – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी व अन्य मागण्यांवर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
या मोर्चाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून घोषणादेत करण्यात आली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तहसील कार्यालयाच्या उंबरठ्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हाध्यक्ष पार्वती स्वामी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार प्रवीण सुळ यांना निवेदन दिले.
सदरचे निवेदन देताना तालुकाध्यक्ष माया नष्टे, निर्मला स्वामी, सिद्धार्थ प्रभुणे, मेघा पवार उज्ज्वला क्षीरसागर, प्रीती सावंत, राणी रुपनवर, स्वप्नाली धाईंजे, शारदा मस्के, सुमन शेंडे, भिवराबाई बोराटे, उज्वला जगताप उपस्थित होते.