29.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक

नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक

जमावाला भडकावल्याचा आरोप पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!

नागपूर : नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाच्या तपासात रोज नवी माहिती पुढे येत असताना नागपूर पोलिसांनी या प्रकरणात तिसरी मोठी अटक केली आहे. फैजान खातीब सह आणखी एक आरोपी शहबाझ काझी यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

त्यामुळे अद्याप नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. फैजान खातीब हा अकोल्यामध्ये असतो. मात्र ईद निमित्त महिनाभरापूर्वी तो त्याच्या मूळगावी म्हणजेच नागपुरात आला होता. १७ मार्चला नागपूरला झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हीडीओ फुटेजच्या माध्यमातून खातीबला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच
नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहिम खान आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर नंतर फैजान खातीब ही या प्रकरणातील तिसरी मोठी अटक मानल्या जात आहे. यापूर्वी नागपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या ११३ वर पोहोचली होती. आता त्यात आणखी आरोपींची भर पडली आहे.

पंतप्रधानांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क
नागपुरात नुकतच उसळलेला हिंसाचार आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरात होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा हे पाहता, पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवणे सुरू केले आहे. कोणत्याही प्रकारच्या हेट स्पीचवर नजर ठेवण्यासाठी नागपूर सायबर सेलने विशेष टीम तयार केली असून पंतप्रधान यांच्या दौ-या दरम्यान सोशल मीडिया वर अफवाह पसरविणारे, हेट स्पीच संदर्भात व्हीडीओ पोस्ट करणारे किंवा त्यांना फॉरवर्ड करणा-यावर कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच सायबर सेल ने दिला आहे. त्यामुळे कायद्याच्या अजाणतेमुळे सोशल मीडिया वर काही ही पोस्ट करण्यापूर्वी विचार करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR