35.1 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeमहाराष्ट्रमोदी राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते

मोदी राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते

संजय राऊत यांचा दावा पुढचा वारसदार संघ ठरवणार, तो महाराष्ट्रातून असेल

मुंबई : मागील अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात गेलेले नाही. मात्र आता ते मी जात असल्याचे सांगण्यासाठी तेथे गेले होते. ते त्यांचा राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध नरेंद्र मोदी यांनी कुठून लावला? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंर्त्य लढ्यात संघाचे योगदान काय? यावर नरेंद्र मोदी यांनी आमच्याकडून ब्रीफिंग घ्यायला हवी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघाने काय केले? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यांनी जखडलेला होता. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, सरदार पटेल, सावरकरांपर्यंत या सर्वांच्या नेतृत्वात हा लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या.

मोदी म्हणतात तो संघ यामध्ये कधीच आणि कुठेही नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचा प्रयत्न जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशातील जनतेची मानसिकता सुधारणार नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही लोकांना अंध भक्त आणि वेडे करत आहात. त्यामुळे हा देश वेड्यांच्या देशांच्या यादीत येऊ शकतो, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा निर्णय संघ घेणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR