29.7 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeमहाराष्ट्रकोकाटे साहेब, थोडक्यात वाचलात..;रोहित पवारांचा टोला

कोकाटे साहेब, थोडक्यात वाचलात..;रोहित पवारांचा टोला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी थेट शेतक-यालाच शेतकरी कर्जमाफीवरून सुनावल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका करताना कोकाटेंचा समाचार घेतला आहे. सध्या कोकाटे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे.

याआधीच कोकाटे कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्यावरून अडचणीत आले होते. त्यांची आमदारकी थोडक्यात वाचली होती. दरम्यान आता पुन्हा त्यांनी आपल्यावर संकट ओढावून घेतले आहे. कर्जमाफीवरून शेतक-याने विचारलेल्या प्रश्नावर कोकाटेंनी आपला संताप व्यक्त करताना शेतक-यालाच सुनावले.

रोहित पवार यांनी देखील कोकाटे यांना सुनावले, कोकाटे साहेब आपण थोडक्यात बचावला आहात, जरा जपून, असाही टोला त्यांनी लगावला आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट करत ही टीका केलीय. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी, कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांत जमा होतो, शेतक-यांना तो थेट मिळत नाही. कदाचित याची माहिती मंत्रिमहोदयांना नसावी. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्यासारखे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतक-यांना ब्रह्मज्ञान शिकवू नये.

कोकाटे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा : संजय राऊत
याच मुद्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोकाटे यांचा समाचार घेताना ते कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झाले असून पवार, पटेलांसह राज्यात सध्या कॉमेडी शो सुरू असल्याची टीका केली आहे. कोकाटे गेली अनेक वर्षे राजकारणात असून त्यांनी शेतक-यांना दुखावणारे अशा पद्धतीने वक्तव्य केले आहे. यामुळे आता अजित पवार यांनीच प्रफुल्ल पटेल आणि कोकाटेसारख्यांना लगाम घालावा, अशी मागणी केली आहे. सध्या तिघांची भाषणे ऐकली तर राज्यात कॉमेडी शो सुरू केल्याचे समोर येत असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR