कोलकाता : वृत्तसंस्था
वक्फ दुरुस्ती कायदा विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज पोलिस ठाणे हद्दीत उमरपूर-बानीपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ वर चक्काजाम केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या २ वाहनांना आग लावली आहे. यामुळे परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याला विरोध होत असून, या कायद्याला विरोध करण्यासाठी आज निदर्शने सुरू होती. हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी निदर्शक करीत होते. यावेळी पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी निदर्शकांनी संतापाने पोलिसांच्या अंगावर विटांचा मारा केला. तसेत रस्त्यांवर चक्काजाम केला. त्यानंतर निदर्शकांनी रस्त्यांवरील पोलिसांच्या २ वाहनांना पेटवले. ज्यामुळे याक्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरले.
मुर्शीदाबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १२ बंद करण्यात आला. निदर्शकांना आवरण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यावेळी निदर्शकांनी तोडफोड सत्र सुरु केले. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या कारवाईमुळे तणाव वाढला. मात्र, स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुळात वक्फ दुरुस्ती विधेयक आता संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झाले आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाल्याने वक्फ विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मालमत्तेचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुधारणा आणण्यासाठी वक्फ बिलात सुधारणा केल्या आहेत. वक्फ ही एक इस्लामिक संस्था असून त्यात एखादी मालमत्ता धर्मादाय कारणांसाठी दान केली जाते आणि त्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न मुसलमानाच्या सामाजिक सेवा, शिक्षण आणि इतर धार्मिक कार्यांसाठी वापरले जाते. परंतु याचा उद्देश मुस्लिमांच्या शिक्षणासाठी किंवा इतर विकासासाठी होत नव्हता, असा सरकारचा आक्षेप होता.
त्यामुळे वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करणा-या या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सरकारने आणले होते. ते विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, याला विरोध होत आहे. याची ठिणगी पश्चिम बंगालमध्ये पडली आहे.
मुर्शिदाबादमध्ये आंदोलन हिंसक
वक्फ दुरुस्ती कायदा विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज पोलीस ठाणे हद्दीत उमरपुर-बानीपुर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले.या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ वर चक्का जाम केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावली आहे. यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.