37.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरसाडेचार लाख वीज ग्राहकांनी भरले १४५ कोटी रुपयांचे ऑनलाईन वीज बिल 

साडेचार लाख वीज ग्राहकांनी भरले १४५ कोटी रुपयांचे ऑनलाईन वीज बिल 

लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या ऑनलाईन वीज भरण्याच्या हाकेला लातूर परिमंडळातील वीजग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या मार्च महिन्यात लातूर परिमंडलातील सुमारे चार लाख ६९ हजार ८९४ वीजग्राहकांनी १४५ कोटी १९ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरले आहे. वीजबिलात मिळणारी सवलत आणि बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरणा सुविधेस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.
लातूर परिमंडलांतर्गत येणा-या बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांतील ३ लाख ३३ हजार ६९५ वीजग्राहकांनी फेब्रुवारी महिन्यात ७१ कोटी ५६ लाख रुपयांच्या वीजबीलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील १ लाख ६३ हजार १४ वीजग्राहकांनी ३४ कोटी २३ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. तसेच बीड जिल्हयातील ९४ हजार ९४५ वीजग्राहकांनी २१ कोटी २३ लाख रूपयांचे वीजबील ऑनलाईन भरले आहे. तर धाराशिव जिल्हयातील ७५ हजार ७३६ वीजग्राहकांनी १६ कोटी १० लाख रूपयांचा वीजबील भरणा केल्याचा समावेश आहे.
 त्याचबरोबर हाच आलेख वाढत जावून मार्च महिन्यात ४ लाख ६९ हजार ८९४ वीजग्राहकांनी १४५ कोटी १९ लाख रूपयांच्या वीजबीलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील २ लाख ३३ हजार ५० वीजग्राहकांनी ७१ कोटी ६२ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार २४३ वीजग्राहकांनी ४१ कोटी २१ लाख रूपयांचे वीजबील ऑनलाईन भरले आहे. तर धाराशिव जिल्हयातील १ लाख १ हजार ६०१ वीजग्राहकांनी ३२ कोटी ३५ लाख रूपयांचा वीजबील भरणा केल्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस वीजग्राहक वीजबील भरणा केंद्रासमोरील रांगा टाळत ऑनलाईन सेवेला प्राधान्य देत असल्याचे चित्र लातूर परिमंडळात दिसून येत आहे.
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास सेवा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.  वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR