29.4 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeलातूरजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचे निधन 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचे निधन 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय गुंडेराव बनसोडे गुरुजी यांचे दि. १० एप्रिल रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता लातूर तालुक्यातील गंगापूर येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्तात्रय बनसोडे गुुरुजी हे एम. ए. एल. एल. बी. होते. गंगापूर येथील जय किसान विद्यामंदीर येथे ते १९७० साली मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. दत्तात्रय बनसोडे गुरुजी १९९२ ते १९९७ दरम्यान लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. २००५ साली ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. २०१२ ते २०१५ या काळत्तत त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुक लढवली होती. ते दहावी, बारावी बोर्डाचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष या पदावरही कार्य केले होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पंतू, असा मोठा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा जालना येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तर दुसरा मुलगा लातूर येथे विधिज्ञ म्हणून कार्यरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR