मुंबई : एका राम नावाच्या एका व्यक्तीने त्याचा मुंबईतील रेस्टॉरंटमधील अनुभव शेअर केला आहे. मुंबईतील उच्चभ्रू भागात असलेले हे रेस्टॉरंट बरेच लोकप्रिय आहे. तो या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन लोकांचा पेहराव असलेले धोतर किंवा वेस्थी घालून त्या हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र त्या पेहरावामुळे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळाली नाही, असे त्याने पत्रकारांशी बोलताना आरोप केला आहे. आता या मुद्यावरून खळबळ माजली आहे.
तसेच रामराज कॉटनचे अध्यक्ष आणि संस्थापक, के.आर. नागराजन यांनी यासंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. तसेच सर्वांनी एकमेकांप्रती समजूतदारपणा दाखवावा आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करावा, अशी विनंती त्यांनी केली. एखाद्या व्यक्तीने, कोणते, काय कपडे घालावेत हा त्यांचाय वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळाले आहे, या मुद्यावर प्रकाश टाकत के.आर. नागराजन व्यवस्थापनाकडे मार्मिक शब्दांत कैफियत मांडली. ते म्हणाले की, व्यवस्थापनाला अशी विनंती करतो की, त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये असलेले धोतर किंवा वेस्थीचे महत्व समजून घ्यावे. तसेच जे लोक हा (धोतर) पेहराव घालून तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येतील त्यांच्याशी दयाळूपणे आणि आदराने वागावे.