बीड : तापमानाचा उच्चांक आणि अवकाळी पावसाच्या इशा-यांमुळे सध्या १०० रुपयांवर असणारा टोमॅटोचा भाव अवघ्या पाच रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील अनेक शेतक-यांनी खर्च करत टोमॅटोची पीक घेतले आहे.
मात्र ऐन तोडणी वेळी टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो बाजारात विक्रीसाठी नेणे देखील शेतक-यांना परवडणारे नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला गळती लागली. यातच टोमॅटोचे दर घसरले असून खत, बियाणे, मजुरी यासाठी केलेला खर्च देखील आता निघत नाही. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.