36.5 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeक्रीडाआरसीबीचा राजस्थानवर ९ गड्यांनी विजय

आरसीबीचा राजस्थानवर ९ गड्यांनी विजय

आरसीबीची तिस-या स्थानावर झेप

जयपूर : आयपीएल २०२५ स्पर्धेच्या २८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्स संघाला १७३ धावांवर रोखले. राजस्थान रॉयल्सने सावध खेळी केली मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थान रॉयल्सलने २० षटकांत ४ गडी गमवून १७३ धावा केल्या आणि विजयासाठी १७४ धावांचे आव्हान दिले.

राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७५ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विजयासाठी मिळालेले १७४ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज गाठले. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीने हे आव्हान सोपे केले. फिलिप सॉल्टने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ६५ धावा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे धावांमधील अंतर कमी झाले आणि विजय सोपा झाला. विराट कोहलीने ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारून नाबाद ६२ धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने नाबाद ४० धावांची खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या विजयासह गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या सामन्याआधी ६ गुण आणि +०.५३९ नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर होता. मात्र आता राजस्थानला पराभूत करून थेट तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. बंगळुरुने ८ गुण आणि नेट रनरेट हा +०.६७२ झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना मागे टाकले आहे. राजस्थान रॉयल्सला या पराभवानंतर गुणतालिकेत तसा फटका बसला नाही. राजस्थानचे सातवे स्थान कायम आहे मात्र नेट रनरेट पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR