34.1 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसुदानमधील हल्ल्यात महिलांसह १०० ठार

सुदानमधील हल्ल्यात महिलांसह १०० ठार

दार्फुर : गेल्या अनेक वर्षांपासून अशांत असलेल्या सुदानमधील दार्फुर भागात शुक्रवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये २० मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) या पॅरामिलिट्री समुहाने केल्याचे सांगण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या ओसीएचएने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये निवासी भाग, बाजार आणि आरोग्य केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. त्यात शेकडो लोक मारले गेले. तसेच अनेक जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संघटनेने हे हल्ले युद्ध गुन्हेगारी आणि मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचा आरोप केला आहे.

मात्र आरएसएफने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जमजम कॅम्पवर सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे सांगितले. आरएसएफला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही आरएसएफने केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांसंबंधीच्या कायद्यांबाबत आपल्या असलेल्या कटीबद्धतेचा आरएसएफने पुनरुच्चार केला आहे. तसेच लष्कराकडून ख-या गुन्ह्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR