34.1 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजॉर्जियामध्ये हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर

जॉर्जियामध्ये हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर

दंडसंहिता । हिंदूविरोधी भेदभावाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न; धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टिने दुर्मिळ पाऊल

तिबीलिसी : वृत्तसंस्था
जॉर्जिया राज्य हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर करणारे पहिले अमेरिकन राज्य ठरले आहे. एसबी ३७५ या ऐतिहासिक विधेयकाच्या माध्यमातून हिंदूविरोधी भेदभावाला कायद्याच्या चौकटीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांच्या सिनेटर्सचा पाठिंबा लाभला आहे. हिंदू धर्मीयांवरील पूर्वग्रह, द्वेष आणि अन्यायाला रोखण्यासाठी जॉर्जिया राज्याने उचललेले हे पाऊल अमेरिकेतील हिंदू समुदायासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. हे अमेरिकन राजकारणात धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ उदाहरण ठरले आहे.

सध्या अमेरिकेतील हिंदू लोकसंख्या सुमारे २५ लाख (०.९%) आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियात मांडण्यात आलेल्या एसबी ५०९ विधेयकाला हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे. एसबी ३७५ हे विधेयक जॉर्जियाच्या दंड संहितेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून हिंदूफोबिया ही संज्ञा कायदेशीरपणे मान्य होईल आणि कायदा अंमलबजावणी संस्था त्यानुसार कारवाई करू शकतील.

Legiscan.com नुसार, हे विधेयक जॉर्जिया राज्य सरकारच्या अधिकृत कोडमधील Chapter 1 of Title 50 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. हे विधेयक असे सुचवते की, ज्या कायद्यांद्वारे वंश, रंग, धर्म, किंवा राष्ट्रीय उत्पत्तीच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई केली जाते, त्या कायद्यांत हिंदूफोबियाची व्याख्या अंतर्भूत केली जावी.

या विधेयकात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपीने कोणत्याही व्यक्ती/समूहाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले होते का, हे ठरवताना हिंदूफोबियाचा विचार करण्याची मुभा न्यायप्रणालीला द्यावी, अशी तरतूद आहे. या विधेयकात व्याख्या, मर्यादा, अंमलबजावणीची तारीख, इतर संबंधित बाबी आणि परस्परविरोधी कायदे रद्द करण्याचा उल्लेख आहे.

विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे
– भेदभावाच्या केसेसमध्ये हिंदूफोबिया विचारात घेता येणार
– कायद्यात ‘हिंदूविरोधी द्वेष’ स्पष्टपणे नमूद होणार
– दोषीवर कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR