लातूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून दुचाकी समता रॅली काढण्यात आली ही रॅली लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. असंख्य भिमसैनिक व आंबेडकर अनुयायांचा सहभागी झाले होते.
सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे फटाक्याची आतिषबाजी करून निघाली. रॅली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क – छ. शिवाजी महाराज चौक – संविधान चौक – छ. शिवाजी महाराज चौक – राजीव गांधी चौक – बस्वेश्वर चौक – बाभळगाव चौक-गरूड चौक – विवेकानंद चौक -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छ. शाहू महाराज चौक – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक – गंजगोलाइर् – गुळमार्केट – म. गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला.
समता दुचाकी रॅलीचे आयोजन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे, कोषाध्यक्ष – बाबा कांबळे, सचिव – राहुल कांबळे, कार्याध्यक्ष-अॅड.रमक जोगदंड, स्वागताध्यक्ष – मा. खासदार. डॉ. सुनील बळीराम गायकवाड उपाध्यक्ष – अमोल शिंदे, चिंटू गायकवाड, सहकोषाध्यक्ष – बालाजी कांबळे, सहसचिव – विजय चौधरी, रवी कांबळे, संघटक-विनय जाकते, आकाश सरवदे, सांस्कृतिक प्रमुख- रामभाऊ कोरडे, वैभव गायकवाड, रितेश गायकवाड जयंती उत्सव समितीचे पदाधिका-यांसह लातूर शहरातील असंख्य भिमसैनिक व आंबेडकर अनुयायांनी
सहभागी झाले होते.