सांगली : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीत कुत्र्याने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.
सांगली शहरातील माळी गल्ली परिसरात ही घटना घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात भिडे गुरुजी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १४) रात्री ११ च्या सुमारास एका धारक-याच्या घरून जेवून परतत असताना ते माळी गल्ली येथे आले असता एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.