36.8 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्गात नग्न करून तरुणाची हत्या;वैभव नाईकांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्गात नग्न करून तरुणाची हत्या;वैभव नाईकांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग :
बीडपेक्षाही सिंधुदुर्गात मोठी दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे, असा गंभीर आरोप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता माजी आमदार नाईक यांनी गंभीर आरोप केले. आज सोशल मीडियावर एक व्हीडीओ पोस्ट करून त्यांनी या प्रकरणी आरोप केले.

कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर (वय ३५) या तरुणाला केवळ हजार रुपये द्यायचे होते म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिका-याने नग्न करून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यातील सिद्धेश शिरसाटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी संबंध आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते. या प्रकरणी सिद्धेशला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि तेथील पदाधिका-यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलिसांना फोन केले आहेत. त्यामुळे यांचा खरा ‘आका’ कोण?, या सिद्धेश शिरसाटचा खरा आका कोण? असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना आहे, असा सवालही माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.

‘आका’ शोधला पाहिजे
वैभव नाईक म्हणाले, पोलिसांनी त्याला मदत करणा-या सगळ्यांचा तपास केला पाहिजे. ज्यांनी कोणी या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत. या संदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र आंदोलन करणार असून या परिस्थितीचा ‘आका’ पोलिसांनी शोधला पाहिजे, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR