सोलापूर : शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत आंदोलन केले. तात्काळ लिलाव सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता. शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून दाखल झालेल्या कांद्याचा लिलाव केला जाईल, असे आश्वास मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसला. शुक्रवारी (ता. ८) कुठलीही पूर्वकल्पना न देताना सोलापूर बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद ठेवले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालय गाठले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी ठिया मांडला. या आंदोलनाची सूचना मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांच्यासह पोलिस प्रशासन बाजार समितीत दाखल झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारात बाबत उद्दिग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे काटे तात्काळ सुरू करत शनिवारी या कांद्याचे लिलाव होतील, असे जाहीर केले. त्याचबरोबर शनिवारी कुठल्याही प्रकारची नवीन आवक बाजारात होणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे शेतकरी आंदोलन मागे घेण्यात तयार झाले.
बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे काटे तात्काळ सुरू करत शनिवारी या कांद्याचे लिलाव होतील, असे जाहीर केले. त्याचबरोबर शनिवारी कुठल्याही प्रकारची नवीन आवक बाजारात होणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे शेतकरी आंदोलन मागे घेण्यात तयार झाले.