मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने ५ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून आस्तिककुमार पांडे यांची एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर रमेश चव्हाण यांच्याकडे राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राहुल गुप्ता यांच्याकडे हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सत्यम गांधी यांना सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. तर विशाल खत्री यांच्याकडे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी पदाची तसेच डहाणू सब डिव्हिजनचे सहायक जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.