30.7 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरआयुक्त धोक्यातून बाहेर; घेतायेत स्वत: श्वास

आयुक्त धोक्यातून बाहेर; घेतायेत स्वत: श्वास

लातूर : प्रतिनिधी
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दि. ५ शनिवार रोजी रात्री उशिरा स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्देवी घटनेमुळे काही क्षणांसाठी का होईना लातूरकर थबकले होते. या घटनेला १० दिवसांहून अधिकाचा काळ उलटल. आता त्यांयावर मुंबईतील कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून ते उपचाराला लातूरच्या सह्याद्री रुग्णालया प्रमाणेच प्रतिसाद देत आहेत. त्यांना कृत्रीम श्वासोश्वास देणारे व्हेंटीलेटर काढण्यात आले असून आता ते स्वत: चांगल्याप्रकारे श्वासोश्वास घेत आहेत. ते स्वत: श्वासोश्वास घेत असल्याने व त्यांच्या प्रकृतीत वरचेवर सुधारणा होत आहे.
आयुक्त मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर त्यांना तात्काळ लातूरातील सह्याद्री हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते  येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मेंदूच्या काही भागात संवेदना कमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे सोमवारी दि. ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान एअर ऍम्बुलन्सद्वारे लातूर विमानतळावरून मुंबईकडे नेण्यात आले.
तेथे ही त्यांनी लातूर प्रमाणेच उपचाराला प्रतिसाद दिला असून त्याच्या मेंदूच्या काही भागात संवेदना कमी असल्याने डाव्या बाजूच्या अवयवयांची हालचाल कमी होत असली तरी त्याच्या उजव्या बाजूचे अवयव पुवर््वत पणेच हालचाल करीत आहेत. त्यांच्यावर लातूरातील सह्याद्री हॉस्पीटल मध्ये जी ट्रीटमंट सुरू होती तीच सेम ट्रिटमेंट कोकीळाबेन हॉस्पीटल मध्ये सुरू असून आता त्यांना कृत्रीम श्वासोश्वास देणारे व्हेंटीलेटर काढण्यात आले असून आता ते स्वत: चांगल्याप्रकारे श्वासोश्वास घेत आहेत.
महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यावर तिस-या दिवसापासून त्यांच्यावर फिजोथेरेपीचे उपचार सुरू करण्यात आले असून ते आता ही सुरूच  असल्याची माहीती त्यांच्यावर प्राथमिक उपचार ते यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना मृत्खूच्या दाडेतून बाहेर काढणारे तसेच  मुंबई येथील कोकीळा बेन हाम्स्पीटल मध्ये आयुक्त मनोहरे यांच्यावर उपचार करणा-या वैद्यकीय तज्ज्ञांच्या संपर्कात असलेले डॉ हणमंत किनीकर यांनी एकमतशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR