नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लवकरच त्यांना आपली कंपनी विकावी लागू शकते, अशी चर्चा आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या तिघांची मूळ कंपनी मेटा आहे. या मेटाविरुद्ध वॉशिंग्टनमध्ये अविश्वास खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याद्वारे यूएस फेडरल ट्रेड कमिशन झुकरबर्ग यांना इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप विकावे लागू शकते.
अमेरिकन नियामकाचा असा विश्वास आहे की खटला ३७ दिवसांत संपू शकतो आणि त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांना त्याच्या कंपन्यांबाबत निर्णय घ्यावा लागेल. अमेरिकन नियामकाने मेटावर केलेली ही आतापर्यंतची सर्वात आक्रमक कारवाई आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटावर यूएस फेडरल ट्रेड कमिशन अर्थात एफटीसीने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या अधिग्रहणावर मक्तेदारी निर्माण केल्याचा आरोप केला आहे. त्यावरूनच अविश्वास खटला सुरू आहे. मात्र मार्क झुकरबर्गने मक्तेदारी निर्माण केल्याचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी याबाबत बोलताना मेटाचा उद्देश लोकांना जोडणे आणि माहिती प्रदान करणे असल्याचे सांगितले.