22.1 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयदेशातील पहिल्या टर्मिनलचे छायाचित्र जारी

देशातील पहिल्या टर्मिनलचे छायाचित्र जारी

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे कामात वेगात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवले असून ते सत्यातही उतरत आहे. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली असून त्यासही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे कामही वेगाने होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँलडवरुन या कामाची पहिली झलक शेअर केली आहे. अहमदाबादच्या साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हबमध्ये उभारण्यात आलेले देशातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनल व्हीडीओ त्यांनी शेअर केला आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. देशाला पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हीडीओ शेअर करत बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टची झलकच देशवासीयांना दाखवली आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणजे अहमदाबादमधील साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हब हे बुलेट ट्रेनचे टर्मिनल आहे. दरम्यान, भारतातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. १०० किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून २५० किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पाची झलक दर्शविणारा व्हीडीओ शेअर करत प्रकल्पाच्या प्रगतीशी संबंधित माहितीही दिली होती. आता, त्यांनी बुलेट ट्रेनचे देशातील पहिले टर्मिनल उभारण्यात आल्याचा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हीडीओवर नेटीझन्सकडून अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

१०० किमीचा पूल मार्ग
बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ४० मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डर व सेगमेंट गर्डर जोडून १०० किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२६ पहिली बुलेट ट्रेन मिळणार
देशात पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सर्व देशवासीयांसाठी या बुलेट ट्रेनची झलक दाखविण्यात आली आहे. भारतातील या ट्रेनचे पहिल्या टप्प्यातील काम वेगाने होत आहे. या प्रकल्पासाठी १०० किमी लांबीचा पूल बांधण्यात आला असून २५० किमी साठी खांब उभारण्यात आले आहेत. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन आहे. त्यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे टर्मिनल उभारण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR