19 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeमहाराष्ट्रफटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, अशीही माहिती समोर येत आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.

शुक्रवारी दुपारी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवले आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. वाढदिवसाल्या लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR