लातूर : प्रतिनिधी
राज्यातील साखर उद्योगांमध्ये दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ यशस्वीपणे संपन्न झाला. मांजरा परिवाराचे कुटुंबप्रमुख सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी या हंगामात कारखान्याकडे गाळपास येणा-या ऊसासाठी किमान ३ हजार रुपये प्रति मॅट्रिक टन ऊस दर देण्याचे जाहीर केलेले होते. कारखान्याकडून या अगोदर ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना प्रति मे.टन २ हजार ८०० रुपये अदा केलेले आहेत. शेती व उन्हाळी कामांसाठी शेतक-यांना मदत व्हावी यादृष्टीने, या गाळप हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति मे.टन २०५ रूपये दि. १७ एप्रिल रोजी ऊस बिलाचा अंतिम हप्ता, ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा होणार आहे. यानुसार एकूण ३००५ रूपये अंतिम ऊसदर शेतक-यांना अदा करण्यात आले आहेत.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिलेला शब्द पाळत शेतक-यांच्या कष्टाला डोळ्यासमोर ठेवून तीन हजार पेक्षा अधिक दर दिला असल्याने उस उत्पादक शेतक-यांना मोठा आधार मिळाला आहे. तरी ज्या ऊस पुरवठादारांचा गळीत हंगाम २०२४/२०२५ मध्ये ऊस कारखान्यास गाळपास आला आहे. त्यांनी आपल्या संबधीत बँक शाखेशी संपर्क करावा व अंतीम बिलाची रक्कम घ्यावी, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.