36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीय४०० प्रवाशांसह बोट उलटली; ५० मृत्युमुखी, १०० जण बेपत्ता

४०० प्रवाशांसह बोट उलटली; ५० मृत्युमुखी, १०० जण बेपत्ता

 

बोलोम्बा : वृत्तसंस्था
आफ्रिकेतील कांगो देशात रात्री प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १०० लोक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या लोकांना शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एचबी कोंगोलो नावाची बोट माटनकुमु बंदरातून बोलोम्बा क्षेत्रासाठी निघाली होती. परंतु, म्बांडाका शहराजवळ अचानक बोटीला आग लागली. एक महिला जेवण बनवत असताना आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकांनी नदीत उड्या घेतल्या. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १०० लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, आगीत होरपळून जखमी झालेल्या आणि दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांचा ठावठिकाणा कळलेला नसून शोध मोहीम राबवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR