36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeभगवद्गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये

भगवद्गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये

युनेस्को : वृत्तसंस्था
श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र या दोन्हीला आता युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी हे ऐतिहासिक क्षण आहेत. युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये जगातील महत्त्वाच्या कलाकृतींची कागदोपत्री वारसास्थळांसह यादी असते. आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार आणि कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने यातील कलाकृतींची निवड केली जाते. या निवडीमुळे भारताचे जागतिक महत्त्व आणि शाश्वत वैश्विक मूल्य सार्वजनिकरित्या मान्य झाले आहे.

मे २०२३ पर्यंत ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये एकूण ४९४ दस्तऐवजीकरण केलेल्या वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला होता. आता या दोन कलाकृतींच्या समावेशामुळे आतापर्यंत भारतातील एकूण १४ नोंदी या रजिस्टरमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतना जोपासली आहे. त्यांतील दूरदृष्टी असलेले विचार जगाला कायम प्रेरणा देत राहतील, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.

भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या दोन्ही कलाकृतींच्या समावेशाची माहिती दिली. केवळ साहित्यिक वारसाच नाही तर भारताच्या सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञानाचा आधारस्तंभ असे त्यांनी या दोन कलाकृतींचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, हे दोन्ही ग्रंथ आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला आकार देणारे आधारस्तंभ आहेत. या रजिस्टरमध्ये आता भारताच्या एकूण १४ नोंदी आहेत. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आणि कलात्मक तेजाचा उत्सव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR