36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूरदिलीपराव देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

दिलीपराव देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १८ एप्रिल रोजी आशियाना निवासस्थानी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत जिल्हाभरातून पाच हजार लोकांनी आशियाना बंगल्यावर येवून माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन केले. अनेकांनी केक कापले तर अनेक सामाजिक संस्थांनी  शालेय मुलांना वह्या वाटप केल्या या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आशियाना निवासस्थानी जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची मोठी गर्दी दिसत होती दरम्यान जिल्ह्यातील व राज्यभरातून माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचां वर्षाव झाला
सकाळी आशियाना बंगल्यावर  खासदार शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ शिवाजीराव काळगे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार अ‍ॅड. त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ  शिंदे, यशवंतराव पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके श्रीशैल्य उटगे, संतोष देशमुख, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, शाम भोसले, अँड प्रमोद जाधव, जगदीश बावणे, अनंतराव, देशमुख, दिलीप माने  सचिन पाटील, सचिन दाताळ, गणपतराव बाजुळगे, हणमंत मोरे, राजेसाहेब देशमुख, अँड. व्यंकट बेद्रे, डॉ. हंसराज बाहेती, पत्रकार जयप्रकाश दगडे पत्रकार  बी व्हि मोतीपवळे, रामेश्वर बद्दर, पत्रकार राम जेवरे, पत्रकार हरी तुगावकर, पत्रकार हरिराम कुलकर्णी, पत्रकार एजाज शेख, डॉ. कदम, डॉ. जाधव, डॉ. कुलकर्णी, प्रा. सिद्धराम कठारे, अविनाश मोरे, अजय पाटील, डॉ आनंद पवार, रमेश देशमुख, राजेन्द्र मोरे राजू कसबे, पंढरपूर अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद विर्धे, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, उद्योजक तुकाराम पाटील, प्रा. शिवराज मोटेगावकर, मांजरा, रेणा, विलास, जागृती, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, संचालक मंडळ, जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक मंडळ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी मान्यवर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR