34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeसोलापूरभावजयीस जिवे मारण्याचा प्रयत्न; दिरास अटकपूर्व जामीन

भावजयीस जिवे मारण्याचा प्रयत्न; दिरास अटकपूर्व जामीन

सोलापूर : भावजईस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिर शेखर बाळासो कडलासकर, वय २७, रा- देवडे ता- पंढरपूर, जि.सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, सविता कडलासकर हिचे लग्न पोपट कडलासकर याच्यासोबत 2007 साली झाले होते, लग्नानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याबाबत तिला समजले होते. ही बाब तिने तिच्या सासू सासऱ्यांना सांगितली होती, त्यावेळी तिस सर्वांनी बेदम मारहाण केली होती. २३/७/ २०१८ रोजी सविता हिने अभ्यास करण्याच्या कारणावरून मुलीस रागावले असता, तिस पती सासू सासरे व दिर यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, अशा आशयाची फिर्याद सविता हिने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिली होती. त्यावरून करकंब पोलीस ठाणे, ता- पंढरपूर येथे गुन्हा दाखल झाला होता.

आपणास अटक होऊ नये म्हणून म्हणून आरोपी शेखर याने पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर आरोपी शेखर याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, सदरचा गुन्ह्यात इतर आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल होऊन खटला पूर्णत्वात आला असून आरोपीची कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 30,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला.यात आरोपीतर्फे ऍड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड. पल्लवी दाभोळकर यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR