36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयरोव्हरला मिळाले मंगळावरील प्राचीन जीवनाचे संकेत

रोव्हरला मिळाले मंगळावरील प्राचीन जीवनाचे संकेत

 

सॅन्फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
पर्सिव्हरन्स रोव्हरने गोळा केलेले नमुने पृथ्वीवर आणले जातील, तेव्हा मंगळावर प्राचीन जीवन होते का? याचे अधिक ठोस पुरावे मिळू शकतात, अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

या संशोधनाचा अहवाल १७ एप्रिल रोजी ‘सायन्स’ या नामवंत वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक, कॅलगरी विद्यापीठातील भूगर्भ, ऊर्जा व पर्यावरण विभागाचे सहयोगी प्राध्यापक बेन टुटोलो यांनी सांगितले, ‘जेव्हा आम्हाला या खडकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साइडेराईट आढळले, तेव्हा मी अतिशय आनंदीत झालो. मंगळावरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे : ‘सर्व कार्बोनेटस् कुठे गेले?’ आणि त्यामुळेच हा शोध किती महत्त्वाचा आहे, हे मला लगेचच कळले.’

पृथ्वीवर सुमारे ४ अब्ज वर्षांपासून कार्बन सायकलमुळे वातावरण आणि जीवनाची साखळी टिकून आहे. ज्वालामुखीमधून बाहेर पडणा-या कार्बन डायऑक्साईडचे शोषण महासागरातील कॅल्शियमद्वारे होऊन चुना दगड निर्माण होतो आणि नंतर ते पुन्हा भूगर्भात जाऊन गरम होतो व पुन्हा वातावरणात येतो. मात्र, मंगळावर पूर्वी नद्या आणि सरोवरे असल्याचे पुरावे असूनही, तेथे कार्बोनेटस्चा ठोस पुरावा आढळला नव्हता.

२०१२ मध्ये मंगळावर उतरलेल्या क्युरिऑसिटी रोव्हरने गेल क्रेटरमधील सुमारे ३४ किलोमीटर अंतर पार करत खडकांच्या रचनांचा अभ्यास केला. २०२२ आणि २०२३ मध्ये त्याने चार ठिकाणी ड्रिलिंग करून खडकांचे नमुने घेतले आणि आपल्या एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने त्यांचे खनिजीय विश्लेषण करून परिणाम पृथ्वीवर पाठवले. टुटोलो आणि त्यांच्या सहका-­यांनी हे विश्लेषण तपासल्यानंतर समजले की या खडकांमध्ये केवळ साइडेराइटचे अंश नाहीत, तर हे खडक त्याने समृद्ध आहेत. काही नमुन्यांमध्ये ते ५ ते १० टक्के वजनभर साइडेराईट होते. या कार्बोनेटमध्ये अत्यंत पाण्यात विद्राव्य असलेले मॅग्नेशियम सल्फेट सॉल्टस्ही आढळले, जे उपग्रह स्कॅनमधून साइडेराईटचा संकेत लपवत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR