ठाणे : अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेने खळबळ उडाली आहे. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला.
अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.