29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूर७५ रुग्णांची मोफत स्तन कॅन्सर, लिव्हर पोटाची सोनोग्राफी, इंडोस्कोपी 

७५ रुग्णांची मोफत स्तन कॅन्सर, लिव्हर पोटाची सोनोग्राफी, इंडोस्कोपी 

लातूर : प्रतिनिधी 
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ. एस. बी. गुगळे मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिर व मोफत कॅन्सर पूर्व निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ रुग्णांची मोफत स्तन कॅन्सर, लिव्हर पोटाची सोनोग्राफी, इंडॉस्कॉपी करण्यात आली.
वैद्यकीय व्यवसाय सांभाळत सामाजिक उपक्रम हाती घेत रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. एस. बी. गुगळे मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढ दिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर व कॅन्सर पूर्व निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन करुन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये स्तनाच्या कॅन्सरसाठी मोफत तपासणी तसेच गर्भपिशवीच्या मुखासाठी मुख कॅन्सर तपासणी, लिव्हरच्या आजारासाठी तपासणी, पोटाची सोनोग्राफी, इंडॉस्कॉपी, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, पोटाचे आजार ,हाडाचे व मणक्याचे आजार आदी आजाराची तज्ज्ञ डॉक्टरकडून मोफत तपासणी करून योग्य तो सल्ला देण्यात आला. डॉ. दीपक गुगळे डॉ. मेघना गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप कवठाळे, डॉ. बंकट फड, डॉ. रवी सोनी, डॉ. एजाज शेख, डॉ. प्रशांत घुले, डॉ. स्वाती पाटील, डॉ. पूनम पावले, डॉ. नम्रता, डॉ. प्रशांत मोहिते या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळेमध्ये आलेल्या जवळपास ७४ रुग्णाची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार व मोफत औषधी वाटप करण्यात आले.
प्रारंभी डॉ. दीपक गुगळे यांनी हे शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गुगळे हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे धिजज देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी कौतुक करुन सामाजिक भान जपणा-या अशा डॉक्टरांची समाजाला खरी गरज आहे असे ते म्हणाले.  यावेळी डॉ. अशोक पोद्दार, डॉ. संदीप कवठाळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, डॉ. सतीश बिराजदार, संतोष देशमुख, राजकुमार पाटील, चांदपाशा इनामदार, डॉ. व्यंकट पांडे, गुगळे हॉस्पिटलचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किशोर  ईसाइ आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंश गुगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR