लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात नळाद्वारे अशुद्ध, गढूळ पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसापांसून होत आहे. त्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी लातूर शहर भाजपाने दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात लातूर शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या पाय-यावर आंदोलन केले. खरे तर केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असताना लातूर भाजपाने सत्तेच्याविरोधातच अजब-गजब आंदोलन केले.
यावेळी प्रभारी आयुक्त जाधव यांना निवेदन देण्यात येऊन लातूर शहरला तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी दिला भाजपाच्याच सत्ताधा-यांना दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रदीप मोरे, रवी सुडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमचळे, माजी नगरसेविका रागिणी यादव, प्रा. उदय देशपांडे, आबा चौगुले, निखिल गायकवाड, संजय गीर, अॅड. विजय अवचारे, अतिश कांबळे, गणेश कसबे, राहुल भूतडा, सुरेश जाधव, अजय भूमकर, सचिन जाधव आदिसह लातूर शहर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.