32.9 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeराष्ट्रीयपर्यटकांवर अतिरेकी हल्ला, २७ ठार

पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, २७ ठार

अतिरेक्यांनी जात विचारून केला गोळीबार, महाराष्ट्रातील पर्यटक जखमी
पहलगाम : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्ल्यात २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तर अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ््या घातल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR