32.1 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeलातूररेणाच्या चेअरमनपदी देशमुख, व्हाईस चेअरमनपदी पाटील बिनविरोध

रेणाच्या चेअरमनपदी देशमुख, व्हाईस चेअरमनपदी पाटील बिनविरोध

रेणापूर : प्रतिनिधी
राज्यात सहकार क्षेत्रात साखर कारखानदारीत अग्रगन्य असलेल्या दिलीपनगर ,निवाडा (ता. रेणापूर) येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अनंतराव दौलतराव देशमुख (ठाकूर)  यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रविण हनमंतराव पाटील  यांची मंगळवार  दि २२ एप्रिल २०२५ रोजी  बिनविरोध निवड झाली आहे.
    राज्याचे माजी मंत्री सहकारीमहर्षी तथा  रेणा साखर कारखान्याचे  संस्थापक  दिलीपराव देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष तथा रेणा साखर कारखानाचे संचालक धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीने मांजरा परिवारातील कारखान्याच्या  बिनविरोध निवडीचा सहकार कारखानदारीत लातूर पॅटर्नची परंपरा राज्यात कायम  राहिली आहे .  रेणा सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात  मंगळवार (२२ एप्रिल)  राज्याचे माजी मंत्री सहकारीमहर्षी तथा संस्थापक दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा बँकेचे अध्यक्ष  धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व  नूतन संचालक मंडळाची  बैठक घेण्यात आली.
या  बैठकीत  सर्वानुमते चेअरमनपदी अनंतराव देशमुख यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून प्रविण पाटील यांचे नाव  सहकारमहर्षीं दिलीपराव देशमुख यानी जाहीर केले. सर्व उपस्थित संचालक मंडळाने  एकमताने या निवडीचे स्वागत केले आहे.       यावेळी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी औसा-रेणापूर अविनाश कोरडे यानी  काम पाहिले. त्याना  सहाय्यक  निंबधक सचिन माळी यानी सहकार्य केले. चेअरमन पदासाठी अनंतराव देशमुख  व व्हाईस चेअरमन पदासाठी  प्रविण पाटील  यांचे प्रत्येकी एक अर्ज निवडणूक अधिका-यांकडे दाखल  झाल्याने निवडणूक अधिकारी कोरडे यांनी उपरोक्तांची निवड बिनविरोध  झाल्याची  घोषणा केली.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन  प्रविण पाटील  यांचा  माजी मंत्री सहकारीमहर्षि दिलीपराव देशमुख व  जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  रेणा  साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब पाटील, माजी आ.त्र्यंबकराव भिसे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील, संग्राम माटेकर, सतीश पवार, धनराज देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, शंकराव पाटील, तानाजी कांबळे, अमृता देशमुख, वैशाली माने, संभाजी रेड्डी, बालाजी हाके पाटील, रंजीत पाटील, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांच्यासह लातूर जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव , संत शिरोमनी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR