मुंबई : काश्मीर खो-यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. सुरेश बिराजदारही या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
दरम्यान, महाराष्ट्रातून अनेकजण जम्मू-काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. हल्ल्यावेळी थोड्याच अंतरावर काहीजण होते, तर काहीजण हल्ला होण्याआधी परिसरातून निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश बिराजदार कुटुंबासोबत फिरायला काश्मीर खो-यात गेले होते. हल्ला झाला त्यावेळी ते तीन किमी जवळच होते. हल्ला झाला त्या घाटीतच ते फिरायला जाणार होते, पण त्याआधीच त्यांच्यापर्यंत हल्ल्याची माहिती पोहोचलीनशीब बलवत्तर होते म्हणून भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव वाचला अन् त्यांनी हॉटेलमधून निघणं टाळलं. नशीब बलवत्तर म्हणून बिराजदार यांना हल्ल्याची माहिती मिळाली.
सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते कुटुंबासोबत पर्यटनासाठी काश्मीर खो-यात पहलगाम परिसरात फिरायला गेले. ते ज्या ठिकाणी मुक्कामी होते, त्यापासून हाकेच्या अंतरावरच दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ते म्हणाले की, आम्ही तिकडे निघालो होतो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली. त्यामुळे आम्ही तिकडे जाणे टाळले. घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणांत भारतीय सैन्याने या परिसराला वेढा घातला. तात्काळ रुग्णवाहिका परिसरात दाखल झाल्या. त्यामुळे दहशतवाद्यांना तिथून पळ काढावा लागला, अनेकांचा जीव वाचला. भारतीय सैन्याच्या या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो.
पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे स्वत: उपस्थित होते. जम्मू-काश्मीर येथे फॅमिलीसोबत पर्यटनासाठी ते गेले आहेत. हल्ला झाला त्यावेळी ते बेलगाम परिसरात होते, अगदी त्या ठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पहलगाममध्ये हल्ला झाला होता.
बिराजदार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाला धर्म नसतो असेही यावेळी त्यांनी सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.