सोलापूर : जागतिक वसुंधरा दिन व बसव जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे दररोज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांनी एक बाटली पाणी आपल्या सोबत आणून आपण व्यायाम करीत असलेल्या परिसरातील झाडांना घालून वृक्ष संवर्धन करावे अशा आशयाचे १ हजार पत्रक वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
दयानंद महाविद्यालयातील मैदानावर सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष दीनानाथ धुळम यांच्या हस्ते व दयानंद मॉर्निंग क्लब अध्यक्ष भारत पवार यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ अजित दुलंगे, डॉ संजय कळके, डॉ. सुनिल कबाडे, डॉ. विजयकुमार स्वामी, डॉ. विनोद लाड, आडत व्यापारी सिद्रामप्पा हुलसुरे, श्रीशैल शेरीकर, बंडप्पा फुलझळके, केदार चाकोते, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गंगाधर झुरळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, मनोज पाटील, गंगाधर झुरळे, अमित कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.
वीरशैव व्हिजन तर्फे ‘एक बाटली पाणी झाडासाठी’ पत्रक वाटप शुभारंभ प्रसंगी दीनानाथ धुळम, भारत पवार, डॉ. अजित दुलंगे, डॉ. सुनील कबाडे, डॉ. विजयकुमार स्वामी, डॉ. विनोद लाड, सिद्रामप्पा हुलसुरे, श्रीशैल शेरीकर, बंडप्पा फुलझळके, केदार चाकोते, विजयकुमार बिराजदार उपस्थीत होते.