33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रनियोजित काश्मीर टूर रद्द

नियोजित काश्मीर टूर रद्द

पर्यटनाला मोठा फटका; शेकडो कोटींचे नुकसान?

नागपूर : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देशातील जवळपास प्रत्येक शहरातून, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने काश्मीरला जाण्यासंदर्भातले नियोजित टूर्स रद्द केले जात आहेत. लोक आपल्या नियोजनात बदल करत आहेत.

दरम्यान, नागपुरातून एकाच दिवसात काश्मीरमध्ये जाऊ इच्छिणा-या शेकडो कुटुंबं किंवा ग्रुप्सनी आपले येणा-या दिवसातील टूर्स रद्द केले आहेत. आम्ही आपल्याच देशाच्या एका भागात सुरक्षित नाही आहोत, ही भावना अस्वस्थ करणारी असल्याचे वानखेडे कुटुंबीयांनी सांगितले. वानखेडे कुटुंबातील १२ सदस्य एक आठवड्याच्या काश्मीर टूरला जाणार होते.

पहलगाममध्ये ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणी दोन दिवस थांबणार होते. मात्र कालच्या घटनेनंतर त्यांनी फक्त पहलगामच नाही, तर काश्मीरमध्ये जाण्याचा निर्णयच बदलला आहे. आम्हाला आमच्या नियोजित आनंदाला तर मुकावे लागतच आहे, मात्र एका दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील हजारो गरजू कुटुंबीयांचे पर्यटनापासून होणारे उत्पन्नही त्यांनी गमावले आहे. हेही दुर्दैवी असल्याचे मत वानखेडे कुटुंबीयांनी व्यक्त केले. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. नागपूरसह देशभरातून हजारो ग्रुप्स आणि कुटुंबीयांनी त्यांचे येणा-या दिवसातील काश्मीर टूर रद्द केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR