33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रएप्रिल महिनाखेर जमा होणार रक्कम

एप्रिल महिनाखेर जमा होणार रक्कम

मुंबई : प्रतिनिधी
अनेक लाडक्या बहिणी सध्या १५०० रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असे म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून १५००रुपये दिले जातात. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झालेले नाहीत.

त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरू असून, योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणा-या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांचे उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून ९ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या महिलांच्या अर्जांची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यावर सुरू करण्यात आली. यात ज्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तसेच ज्या सरकारी नोकरी करत आहेत अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR