30.3 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeलातूररस्त्याच्या कामाला सुरुवात

रस्त्याच्या कामाला सुरुवात

लातूर : प्रतिनिधी
शहरातील एक नंबर चौक ते सुभेदार रामजीनगरमार्ग रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते. राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याच्या कामास दि. २४ एप्रिल रोजी प्रारंभ झाला असून स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नव बौद्ध वस्ती सुधार योजने अंतर्गत इंडियानगर भागात २०२१-२२ मध्ये नाला मंजूर करण्यात आला होता. मात्र स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय व त्यांच्या मागणीस्तव नाल्याऐवजी शहरातील रस्त्याचे कामे प्रस्तावित करण्यात आले. या मागणीचा विचार करुन दि. २७ मे २०२२ च्या प्रशासकीय मान्यतेस सुधारित प्रशासकीय मंजुरी दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आली. त्यामध्ये एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणा-या रस्त्याच्या कामालाही मंजुरी घेण्यात आली. मात्र सदरील काम कांही तांत्रिक अडचणीमुळे मागील कांही दिवस प्रलंबीत राहिले.
यावर पुन्हा आमदार  अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित कामाबाबत शासन स्तरावर बैठक घेऊन सदरील काम तत्काळ चालु करण्याचे आदेश महानगर पालिका प्रशासनास देण्यात आले होते त्या अनुषंगाने शहरातील एक नंबर चौक ते सुभेदार रामजी नगरकडे जाणा-या रस्ते कामाची सुरुवात गुरुवारी सकाळी नारळ वाढवून करण्यात आली.  स्थानिक नागरिकांनी काम सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान या कामाचा शुभारंभ माजी विरोधी पक्षनेते व माजी महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, प्रभाग क्रमांक ११  चे निरीक्षक डॉ. बालाजी सोळुंके, प्रभाग क्र. १० चे निरीक्षक बालाजी मुस्कावाड, प्रभागातील माजी नगरसेवक आकाश भगत, रत्नदीप अजनीकर, समन्वयक मनोज देशमुख, अनुसूचित  जाती विभाग शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, आनंद वैरागे, प्रा.शिवशरण हावळे, भीमराव मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी रफिक करकम, अजय सूर्यवंशी, साजिद शेख, कमलाकर सुरवसे, राजु ढाले, गोविंद गायकवाड, बाळु गायकवाड, सतीश ढाले, दयानंद कांबळे, सुरेश बनसोडे,समशेर पठाण, समीर शेख, अभंग कांबळे, आशाताई कांबळे, यांच्यासह प्रभाग १० व ११ मधील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR