लातूर : सिध्देश्वर दाताळ
मागील काहि दिवसापासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यासह शहरातील तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा वाढत्या तापमानात उष्माघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने. गेल्या काही दिवसापासून येथील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे कोल्ड रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात झाल्यात रुग्णाला तत्काळ उपचार उपलब्ध व्यावा यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयातील या कोल्ड रुममध्ये कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच कोल्डरुमचं वातावरण थंड राहण्यासाठी आवश््यक उपाययोजना केल्या आहेत. उष्माघाताची लक्षणं आढळणा-या रुग्णांच्या तपासणीसह उपचारही केले जातात. उष्माघाताच्या रुग्णांकरिता आवश््यक औषधेदेखील याठिकाणी ठेवण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्याचे तापमाण ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. या तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता संभावता येत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात कोल्ड रुमची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन जाधव यांनी दिली आहे.
तसेच नागरीकांना वाढत्या तापमानाचा फटका वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचं आवाहनही डॉ. सचिन जाधव यांनी एकमतशी बोलताना केले आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावची आवश््यक आहे. लातूर जिल्ह्यात गतवर्षापासून एकही उष्मघाताचा रूग्ण आढला नसला तरी शहरातील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात कोल्ड रुमची व्यवस्था करण्यात आली आहे.